सोलापूर : श्री दत्त इंडिया साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामामध्ये सात लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट

सोलापूर: श्री दत्त इंडिया प्रा. लि, हाविनाळ कारखान्याचा चालू गळीत हंगामाचे रोलर पूजन, संचालक चेतन धारू यांच हस्ते पार पडले. सत्यनारायण पूजा कंपनीचे प्रशासन अधिकारी रवींद्र या गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. श्री दत्त इंडिया साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामामध्ये सात लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याकरिता अद्ययावत मशिनरी बसविण्याचे काम जोमाने चालू आहे. गाळपाकरिता लागणाऱ्या उसाच्या नोंदी, लागणारी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा करार केलेले असल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी सांगितले. श्री दत्त इंडिया कारखान्याच्या रोलर पूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

कारखान्याचे चेअरमन प्रीती रूपारेल, संचालक जितेंद्र धारू, अधिकारी भारत तावरे, रवींद्र गायकवाड, रविराज भोसले, व्यंकटेश राव, जितेंद्र मेटकरी, अनिरुद्ध पाटील, विजय हत्तुरे, रवींद्र बिराजदार उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस हाविनाळ साखर कारखान्यास पाठविण्याबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी संग्राम सूर्यवंशी, सचिन निकम, धनंजय पाटील, विनायक पुजारी, चंद्रकांत बिराजदार, साहुकार कोळेकर, साखरवाडी युनिटचे अजित जगताप, विशाल साखरे कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, हितचिंतक उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here