सोलापूर : सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पांडुरंग कारखान्याची वाटचाल

सोलापूर: पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कारखाना परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. चेअरमन प्रशांत परिचारक, व्हा. चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. सुधाकरपंत परिचारक यांनी कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, कामगार तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात ठेऊ असे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी यावेळी सांगितले.

परिचारक यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कारखान्याची वाटचाल सुरू ठेवण्याचा निर्धार चेअरमन प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला. कार्यकारी संचालक डॉ. कुलकर्णी म्हणाले की, सहकार, शेती, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सुधाकरपंत परिचारक यांनी निर्माण केलेला आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे. यावेळी दिनकर भाऊ मोरे, विजय जाधव, रामचंद्र सावंत-पाटील, उपनगराध्यक्ष भीमराव रेडे-पाटील, गटनेते राहुल रेडे-पाटील, नानासाहेब मुंडफणे, संजय मुंडफणे, भाऊसाहेब कुलकर्णी, अनिल जाधव, अनिल मुंडफणे, मौला पठाण, कारखान्याचे अधिकारी एम. आर. कुलकर्णी, संतोष कुमठेकर, रवींद्र काकडे, अमोल बारटक्के, सचिन विभूते, महेश देशपांडे, सोमनाथ भालेकर, हनुमंत नागणे, आर. एस. पाटील, एस. ए. ताम्हाणे, डॉ. सुधीर पोफळे, एस. वाय. सय्यद, एम. एल. उपासे, आर. डी. गाजरे, एस. एन. कदम, बी. एस. बाबर आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here