पुणे :ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचा उद्घाटन समारंभरविवारी (दि. २३) सायंकाळी ५ वाजता औंध पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील, अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
ओंकार साखर कारखाना व समूहाच्या पुढील वाटचालीसाठी नवीन मुख्य कार्यालय महत्त्वपूर्ण ठरणार असूनकारखान्याच्या प्रशासकीय व व्यावसायिक कामकाजाला, यामुळे अधिक गती मिळणार आहे. उद्घाटन समारंभास सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी, सभासद आणि हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी केले आहे.हा कार्यक्रम ओंकार ग्रुप, ऑफिस क्र. ५०१, पाचवा मजला, फॉर्च्यून बिझनेस हाऊस, सकाळनगर गेट नं. २, औंध, पुणे येथे होणार आहे.


















