सोलापूर : सभासद शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सिद्धेश्वर कारखान्यात साखर वाटप पूर्ववत

सोलापूर : सोमवारी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून सभासदांना सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या साखरेचे वाटप अचानक बंद करण्यात आले. बाजारात साखरेचे दर वाढल्याने कारखाना प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळी सभासदांनी ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे दुपारनंतर साखर वाटप सुरू करण्यात आले. गेल्या दोन दिवसांत ८०० क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

मंगळवारी, दि. २५ रोजी साखर खरेदीसाठी सभासदांनी मोठी गर्दी केली होती. सिद्धेश्वर साखर कारखान्याने सभासदांना देण्यात येणाऱ्या साखरेचे वाटप पुन्हा सुरू केले असल्याचे समजताच साखर खरेदीसाठी कारखान्यावर सभासदांनी मोठी गर्दी केली. सभासदांची संख्या जास्त असल्याने साखर वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कारखान्याचे व्यवस्थापक समीर सलगर यांनी सांगितले की, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून सोमवारी व मंगळवारी या दोन दिवसांत ८०० क्विंटल साखरेचे वाटप सभासदांना करण्यात आले आहे. साखरेचे वितरण नियमित आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here