महाराष्ट्र सरकारकडून साखर साठा तपासण्यासाठी आजपासून विशेष तपासणी मोहीम, प्रत्येक जिल्ह्यात पथके स्थापन

मुंबई : महाराष्ट्र सरकार ने साखर साठेबाजी रोखण्यासाठी गुरुवारी विशेष पथकांची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने याबाबत गुरुवारी (27 ऑगस्ट) जीआर काढला आहे. त्यामध्ये म्हटले आहे कि, केंद्र शासनाने दि. २८.०७.२०२६ रोजीच्या अधिसूचनेव्दारे साखरेबाबत साठा निर्बंध लागू केले आहेत. सदर साखर साठ्यावरील निबंध दि. ०१.०८.२०२६ पासून दि. ३०.११. २०२६ पर्यंत लागू असणार आहेत. त्यानुसार शासकीय संस्था अथवा सार्वजनिक वितरण प्रणाली या व्यतिरिक्त इतर कोणतेही साखर विक्रेते, वितरक साखरेचा साठा प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत धारण करू शकणार नाही, तसेच कोणत्याही वेळी व कोणत्याही ठिकाणी ४,००० क्विंटल (४०० मे. टन) पेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवणार नाही.

तसेच दि. १९.०८.२०२६ रोजीच्या अधिसूचनेव्दारे शासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संस्थाव्यतिरिक्त इतर मोठ्या ग्राहकांसाठी साखरेबाबत साठा निर्बंध लागू केले आहेत, त्यानुसार उत्पादनासाठी, वापरासाठी किंवा कच्चा माल म्हणून प्रति महिना १० मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा वापर करणारा कोणताही मोठा ग्राहक १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी साखरेचा साठा ठेवू शकणार नाही. सदर निर्बंधदेखील दि. ३०.११.२०२६ पर्यंत लागू असणार आहेत. तसेच, साखरेच्या साठ्याच्या प्रत्यक्ष पडताळणीसाठीची प्रमाणित कार्यपद्धती देखील केंद्र शासनाव्दारे निश्चित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने साखरेच्या साठ्याबाबत व साठा पडताळणीबाबत एकत्रित सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

सर्व साखर विक्रेते व वितरक आणि मोठे ग्राहकांसाठी सूचना

I) सर्व साखर विक्रेते व वितरक यांनी अन्नसाठा देखरेख पोर्टलवर (Food Stock Monitoring Portal) (https://foodstock.dfpd.gov.in/) तात्काळ स्वतःची नोंदणी करावी. तसेच सदर पोर्टलवर सध्याची साठा स्थिती भरावी व त्यानंतर नियमितपणे प्रत्येक शुक्रवारी सदर माहिती अद्ययावत करावी.

(ii) सर्व संबंधितांना स्पष्टपणे कळवण्यात येत आहे की, उपरोक्त पोर्टलवर नोदणी न केल्यास अथवा चुकीची/अपूर्ण माहीती भरल्यास, ही बाब गंभीर अनियमितता मानली जाईल आणि दोषी संस्थांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ च्या तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

(iii) साखर विक्रेते व वितरक साखरेचा साठा प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत धारण करणार नाही, तसेच कोणत्याही वेळी व कोणत्याही ठिकाणी ४,००० क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवणार नाही.

(iv) उत्पादनासाठी, वापरासाठी किंवा कच्चा माल म्हणून प्रति महिना १० मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा वापर करणारा कोणताही मोठा ग्राहक १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी साखरेचा साठा ठेवणार नाही.

विशेष तपासणी पथकांची स्थापना –

त्या अनुषंगाने राज्यातील साखर कारखाने, वितरक, व्यापारी व मोठे ग्राहक यांच्या स्तरावरील साखरेचा साठा. विक्री व पाठवणी यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सदर मोहीम दिनांक २७.०८.२०२६ (गुरुवार) पासून राबविण्यात येणार आहे. सदर साठा पडताळणी करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष तपासणी पथकाचे गठण करण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी (अध्यक्ष), जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (सदस्य), साखर आयुक्त कार्यालयाचे सदर जिल्ह्याकरिता नियुक्त असलेले प्रतिनिधी (सदस्य), निरिक्षक, वैधमापन शाखा (सदस्य), पोलीस अधिक्षक / पोलीस निरिक्षक दर्जाचे अधिकारी (सदस्य),

मुंबई व ठाणे परिमंडळाकरिता नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या स्तरावर विशेष तपासणी पथके गठीत करण्याची सूचना करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दक्षता पथकांमार्फत देखील साठा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

साखरेच्या साठा मर्यादेची पडताळणी करण्याकरिता कार्यपद्धती –

1. साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ तसेच केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार लागू असलेल्या साठा मर्यादेचे पालन होत आहे किंवा कसे, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात यावी.

॥. व्यापाऱ्यांकडे कोणत्याही वेळी व कोणत्याही ठिकाणी ४,००० क्विंटल (४०० मेट्रिक टन) पेक्षा अधिक साखरेचा साठा नाही, याची प्रत्यक्ष साठा मोजणीद्वारे खात्री करण्यात यावी.

iii. साखरेचा साठा प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी साठा धारण केलेला नाही, याची संबंधित खरेदी पावत्या, गेट पास, वाहतूक कागदपत्रे व इतर उपलब्ध अभिलेखांच्या आधारे पडताळणी करण्यात यावी.

iv. तपासणी पथकाने संबंधित व्यापाऱ्याच्या नोदणीकृत व्यवसायस्थळास/गोदामास भेट देऊन तेथे उपलब्ध असलेल्या साखरेच्या प्रत्यक्ष साठ्याची पडताळणी करावी.

V. प्रत्यक्ष साठ्याची पोत्यांची मोजणी करून नोद घेण्यात यावी व सदर साठ्याची व्यापाऱ्याने ठेवलेल्या साठा/खरेदी विक्री नोंदवहीतील नोंदींशी पडताळणी करण्यात यावी.

vi. प्रत्यक्ष साठा व अन्नसाठा देखरेख पोर्टलवर व्यापान्याने घोषित केलेला साठा यामध्ये तफावत आहे किंवा कसे, याची तपासणी करण्यात यावी.

vii. संबंधित व्यापान्याने अन्नसाठा देखरेख पोर्टलवर नोदणी केली आहे किंवा कसे तसेच विहित कालावधीनुसार साठ्याची स्थिती अद्ययावत केली आहे किंवा कसे, याचीही पडताळणी करण्यात यावी.

viii. उत्पादनासाठी, वापरासाठी किंवा कच्चा माल म्हणून प्रति महिना १० मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा वापर करणारा कोणताही मोठ्या ग्राहकाने साखरेचा साठा प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी साठा धारण केलेला नाही, याची संबंधित खरेदी पावत्या व इतर उपलब्ध अभिलेखांच्या आधारे पडताळणी करण्यात यावी.

iv प्रत्येक साखर कारखान्याने मोठ्या ग्राहकांना (थेट किंवा डीलर्सद्वारे) विकलेल्या साखरेच्या मासिक प्रमाणाची पडताळणी करावी.

x. मोठ्या ग्राहकांची तपासणी साखरेच्या वापराचे निर्धारण विक्रेते आणि/किंवा खरेदीदारांनी साखरेसाठी लागू असलेल्या सुसंगत ‘Harmonised System of Nomenclature’ (HSN) कोडचा वापर करून दाखल केलेल्या GST (वस्तू आणि सेवा कर) रिटर्नच्या आधारे करावी.

xi. अभिलेख व कागदपत्रांची तपासणी –

तपासणीच्या वेळी संबंधित व्यापाऱ्याकडील पुढील अभिलेख/कागदपत्रांची उपलब्धतेनुसार पासणी करण्यात यावी :

साठा नोंदवही; खरेदी-विक्री नोंदवही; खरेदी पावत्या/चलने; गेट पास; वाहतूक व पाठवणीसंबंधी कागदपत्रे; अन्नसाठा देखरेख पोर्टलवरील घोषित साठ्याचा तपशील; लागू असलेल्या सूट/अपवादासंबंधीची अधिकृत कागदपत्रे इ.

तफावत आढळल्यास करावयाची कार्यवाही

I). घोषित साठा व प्रत्यक्ष उपलब्ध साठा यामध्ये तफावत आढळल्यास त्याची स्पष्ट नोद तपासणी अहवालात करण्यात यावी.

॥.साखरेचा प्रत्यक्ष साठा ४,००० क्विंटलपेक्षा अधिक असल्याचे अथवा साखरेचा साठा ३० दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी धारण केल्याचे आढळल्यास, तसेच, कोणत्याही मोठ्या ग्राहकाकडे उत्पादनासाठी, वापरासाठी किंवा कच्चा माल म्हणून प्रति महिना १० मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा वापर करणारा साखरेचा साठा प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आढळल्यास सदर बाबीची विशेष नोंद करण्यात यावी.

iii. अशा प्रकरणांमध्ये साठ्याच्या ढिगाऱ्यांची / थप्पीची छायाचित्रे, संबंधित नोंदवह्या, कागदपत्रे व इतर आवश्यक पुरावे संकलित करून तपासणी अहवालासोबत जोडण्यात यावेत.

IV. प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी पूर्ण झाल्यानंतर विहित नमुन्यात पडताळणी अहवाल (परिशिष्ट-अ) तयार करण्यात यावा.

V. संयुक्त तपासणीदरम्यान आढळून आलेल्या तफावती, अनियमितता अथवा विहित साठा मर्यादेचे उल्लंघन याबाबतची माहिती संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून, जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ व प्रचलित नियमांनुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात यावी.

उपरोक्त प्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल नोडल अधिकाऱ्याऱ्यांमार्फत शासनास सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here