पुणे : भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी सुरु, आजी-माजी आमदार भिडण्याची शक्यता

पुणे: भीमा पाटस सहकारी साखर कारखाना हा दौंड तालुक्यातील राजकीय पटलावर संघर्षाची भूमी म्हणून ओळखला जातो. या कारखान्याभोवती राजकारण फिरत असल्याने तब्बल ११ वर्षानंतर होणाऱ्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यात काटा लढती होणार असल्याचे संकेत मिळत आहे. आमदार राहुल कुल यांच्यासाठी भीमा पाटस कारखान्यांची निवडणूक प्रतिष्ठतेची झाली आहे. साधारणपणे ५० हजार सभासद असलेला सर्वात मोठा सहकारी असलेला साखर कारखाना अनेक दिवसांपासून हाल अपेष्टा सहन करत आहे.

कारखान्यावर आजही कोट्यवधीचे कर्ज आहे. कारखान्याच्या कारभारावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी नेहमीच झडत असतात. निवडणुकांचे बिगूल वाजल्यानंतर तोफा धडाडणार आहेत. गेल्या १० ते ११ वर्षांपासून कारखान्याच्या बाबतीत अनेक चर्चा होत असतात. प्रस्थापितांना सभासदांचा खरच विरोध आहे की, सभासद विरोधकांच्या बरोबर आहेत. त्याचा निर्णय या निवडणुकीत होऊनच जाऊ द्या, अशी चर्चा सभासदांमध्ये आहे. मध्यंतरी अनेक सभासदांनी जीवाचे रान करून निवडणूक लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना काही प्रमाणात यशदेखील आले. या आखाड्यात आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यांच्या भूमिकेकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात उलटसुलट चर्चा चालू होत्या. परंतु अडथळ्यानंतर कारखान्याची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आता आगामी हालचालींना गती मिळाली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here