पुणे : सोमेश्वर कारखाना निवडणुकीचे पडघम, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना माजी अध्यक्ष शहाजी काकडे करणार मदत

पुणे : राज्यभरात नावाजलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, सभासदांची अंतिम मतदार यादीही प्रसिद्ध झाली आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. कारखान्यावर लाखो लोकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व संसार अवलंबून आहे. त्यामुळे कारखाना व्यवस्थित सुरू राहणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीची मंडळी संचालक मंडळात आल्यास कारखाना अडचणीत येण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आवश्यक ती मदत करणार असल्याची भूमिका काकडे यांनी मांडली.

काकडे म्हणाले की, संचालक मंडळाची निवड करताना सभासदांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी निवडणुकीत सक्षम संचालक मंडळ निवडण्यासाठी सुनेत्रा पवार यांना मदत करण्याची तयारी आहे. मी कारखान्याचा अध्यक्ष असताना महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी आणि क्षमतेपेक्षा अधिक चालणारा सहवीज निर्मिती प्रकल्प सुरू केला. त्याचा फायदा आजच्या गाळपालाही होत आहे. राज्यभरात फुले २६५ या नव्या वाणाला विरोध होत असताना सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात त्याला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आणि जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा मिळाला. गेटकेन उसावर अवलंबून असलेल्या सोमेश्वर कारखान्याला स्वयंपूर्ण करण्याचे काम केले असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी दोन-तीन वर्षे साखर उद्योगासाठी चांगली असून, त्याचा फायदा ऊस उत्पादक सभासदांना मिळवून देण्यासाठी संचालक मंडळाची धोरणे योग्य असणे आवश्यक आहे, असे काकडे यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here