सोलापूर : गोकुळ शुगरच्या कर्मचाऱ्यांचे १५ महिन्यांच्या थकीत वेतनासाठी मूक आंदोलन

सोलापूर : धोत्री (ता. अक्कलकोट( येथील ‘गोकूळ शुगर’ कारखान्यातील कर्मचारी, कामगारांचे १५ महिन्यापासून वेतन थकीत आहे. कारखान्यात सुमारे २०० ते ३०० कर्मचारी व मजूर कार्यरत आहेत. प्रशासनाने तब्बल ५ कोटींचे वेतन आणि पीएफची रक्कम थकवण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या उसाच्या थकीत रकमेसाठी गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या आंदोलनामुळे गोकूळ शुगरचा प्रश्न राज्य पातळीपर्यंत पोचला होता. आता पुन्हा थकीत वेतनाच्या प्रकरणामुळे कारखान्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

कारखान्याचे कामगार गेटसमोर शांततापूर्ण आणि मूक पद्धतीने बसून विरोध दर्शवत आहेत. प्रशासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन लवकरात लवकर अदा करावे, अशी मागणी आंदोलक कामगारांकडून केली जात आहे. मागील १५ महिन्यांपासून कामगारांचे वेतन आणि पीएफ थकीत असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे असा आरोप करत कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर मूक आंदोलन सुरू केले आहे. थकीत पगार न मिळाल्यामुळे कौटुंबिक जीवन विस्कळित झाले असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे ते आपल्या हक्काच्या पैशांसाठी दररोज आंदोलन करीत आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here