अहिल्यानगर : अशोक साखर कारखान्यावर शासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याची शेतकरी संघटनेची मागणी

अहिल्यानगर : ‘एनसीडीसी’कडून कर्ज घेतलेल्या संस्थेने कुठल्याही स्वरूपाची थकबाकी निर्माण केल्यास सदर सहकारी संस्थेचे संचालक मंडळ एक महिन्याच्या आत बरखास्त करून शासकीय प्रशासकीय मंडळाची नियुक्ती प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी करावी, अशी तरतूद आहे. परंतु यास सहा महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. प्रादेशिक सहसंचालक यांनी कुठलीही कारवाई न केल्याने २४ ऑगस्ट रोजी अशोक कारखान्यावर शासकीय प्रशासकीय मंडळाची नियुक्तीचा अर्ज शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे व तालुका अध्यक्ष युवराज जगताप यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहिल्यानगर यांच्याकडे दाखल केला.

याबाबत त्यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली असून पुढील सुनावणी १० सप्टेबर रोजी ठेवली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने सहकार क्षेत्रातील कायदेतज्ज्ञ अँड. अजित बी. चोरमल व अँड. विजय आर. औताडे हे काम पाहत आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील ऊस उत्पादकांची कामधेनू असलेला अशोक कारखाना वाचविण्यासाठी प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करावी, अशी कायदेशीर मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे व तालुका अध्यक्ष युवराज जगताप यांनी प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here