पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; अर्ज माघारीस तब्बल १५ दिवस मुदत

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला असून ११ ऑक्टोबरला मतदान तर १२ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीत अर्जमाघारीस तब्बल पंधरा दिवस तर प्रचाराला फक्त नऊ ते दहा दिवसांचा कालावधी मिळणार आहे. सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक राज्य निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून प्रादेशिक सहसंचालक प्रगती बागल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंतिम यादी व चिन्हवाटप १ ऑक्टोबरला होणार असून त्यानंतर दहाच दिवसांनी मतदान प्रक्रिया होणार आहे. म्हणजे प्रचारासाठी अवघे नऊ ते दहा दिवस उपलब्ध होणार आहेत. सोमेश्वरचे कार्यक्षेत्र १५० गावांचे असून बारामती, पुरंदर, खंडाळा, फलटण तालुक्यात पसरले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

१९९२ नंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात ही पहिलीच निवडणूक असल्याने निवडणुकीस कारुण्याची किनार मिळाली आहे. निवडणुकीसाठी कारखाना कार्यक्षेत्राचे निंबूत-खंडाळा, मुरूम वाल्हा, होळ-मोरगाव, को-हाळे-सुपा, मांडकी जवळार्जुन असे पाच समान गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातून प्रत्येकी तीन असे एकूण १५ सर्वसाधारण गटाचे उमेदवार निवडून द्यायचे आहेत. “ब” वर्ग (सहकारी उत्पादक व बिगर उत्पादक संस्था, पणन संस्था) मतदारसंघातून एक प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे. याशिवाय अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती, इतर मागासवर्ग या तीन मतदारसंघातून प्रत्येकी एक तर महिला राखीव मतदारसंघातून दोन उमेदवार निवडून द्यायचे आहेत.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here