महाराष्ट्र : ऊस वाहतुकीदरम्यान होणारे अपघात रोखणार, वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याचे साखर आयुक्तांचे निर्देश

पुणे : राज्यात सााखर कारखान्यांच्या गळीत हंगामात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता असते. आगामी २०२६-२७ ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रेलर, बैलगाडी, अंगद-जुगाड गाड्या तसेच इतर वाहनांवर रिफ्लेक्टर बोर्ड व रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांना साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी याबाबत एका परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांच्या पुढील व मागील बाजूस रिफ्लेक्टर बोर्ड तसेच रिफ्लेक्टिव्ह टेप बसविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ऊस वाहतुकीदरम्यान वाहनांवर रिफ्लेक्टर नसल्यास पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकाला आकारमानाचा अंदाज येत नाही. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढतो. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना पुढे व मागे रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे, एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून ऊस वाहतूक न करणे, वाहनाच्या मागील बाजूस आरसे न लावणे, चालकाच्या केबिनमध्ये मोठ्या आवाजात संगीत न वाजवणे असे नियम पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहन रस्त्यावर उभे असल्यास त्याच्या मागील बाजूस इतर वाहनांना स्पष्टपणे अंदाज येईल, अशी व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here