महाराष्ट्र : कामगार हिताचे कायदे टिकवण्यासाठी साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचा आंदोलनाचा निर्णय

पुणे : महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाची कार्यकारी मंडळाची व जनरल कौन्सिलची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. सरचिटणीस राऊ शंकर पाटील यांनी संस्थेच्या कामकाजाचे सभेचे विषयाचे वाचन केले. दि.१८ जून २०२५ रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या व जनरल कौन्सिलच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखवले. त्यास सभेने मंजुरी दिली. त्यानंतर कामगारांच्या प्रश्नांबाबत चर्चा करत सर्व पदाधिकारी यांची मते जाणून घेतली.

यावेळी राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी सरकारने कामगार हिताचा कायदा कोणालाही विश्वासात न घेता रद्द केला आहे. आता आगामी काळात तीव्र आंदोलन सरकार विरोधात हाती घेणार असल्याचा इशारा दिला. दरम्यान, सर्वसाधारण सभेत १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ अखेरचा जमाखर्च सरचिटणीस राऊ शंकर पाटील यांनी वाचून दाखवला, त्यास सभेने एकमताने मंजुरी दिली. कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण सांगली, प्रदिप बनगे, उपाध्यक्ष डी. एम. निमसे, युवराज रनवरे, प्रदीप शिंदे, नितीन बेनकर, अशोक बिराजदार, सचिव राजेंद्र तावरे, सयाजी कदम, योगेश हंबीर, संजय मोरबाळे, संजय पाटील, अशोकराव पवार उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here