कोल्हापूर : शाहू साखर कारखान्यास राष्ट्रीय साखर महासंघाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार

कोल्हापूर : राष्ट्रीय साखर महासंघ, नवी दिल्ली यांच्यावतीने गळीत हंगाम २०२४-२५ साठी उच्च साखर उतारा विभागातील ‘सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना’ हा राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा पुरस्कार श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. हा पुरस्कार कारखान्याला सहाव्यांदा मिळाला असून, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरस्कारांची संख्या आता ७३ वर पोहोचली आहे.राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी पुरस्काराची घोषणा केली. कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली. पुरस्काराचे वितरण २२ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.

गळीत हंगाम २०२४-२५ हा राज्यातील सर्वच साखर कारखान्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरला. प्रतिकूल परिस्थितीतही श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने नियोजनबद्ध पद्धतीने विविध स्तरांवर उत्कृष्ट कामगिरी केली. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत राष्ट्रीय साखर महासंघाने कारखान्याला या पुरस्काराने गौरविले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

कारखान्याचे कामकाज चालविताना विक्रमसिंह घाटगे यांनी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे, सभासद शेतकऱ्यांनी दाखविलेला विश्वास व दिलेली प्रामाणिक साथ, तसेच व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांचा हा गौरव असल्याचे मानले जात आहे. समरजितसिंह घाटगे व संचालक मंडळाच्या कुशल नियोजनाखाली सुरू असलेल्या कारखान्याच्या कार्यपद्धतीचा हा सन्मान असल्याचे अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांनी सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here