पुणे : शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यास गेल्यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये सर्वच उत्कृष्ट तांत्रिक पॅरामीटरमुळे राष्ट्रीय कार्यक्षमतेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्यावतीने हा पुरस्कार देण्यात येत आहे. कारखान्याचा सन २०२५-२६ चा गळीत हंगाम हा रौप्यमहोत्सवी गळीत हंगाम होता. या रौप्यमहोत्सवी गळीत हंगामामध्येच देशपातळीवरील सर्वो त्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार मिळाल्याने, कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पुरस्काराबद्दल कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी शुक्रवारी या पुरस्काराची माहिती दिली. सन २०२५-२६ साठीचा राष्ट्रीय पातळीवरील ‘तांत्रिक कार्यक्षमतेचा’ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असल्याचे पाटील यांनी सांगितले. कारखान्यास आजपर्यंत राज्य व देशपातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नवी दिल्ली येथे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते २१ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत पुरस्कार होणार आहे. याप्रसंगी उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, अँड कृष्णाजी यादव, शिवाजी हांगे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील प्रकाश मोहिते, संजय बोडके राजकुमार जाधव, विजय घोगरे सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर उमेश पाटील, महेशकुमार शिर्के आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ उपस्थित होते.


















