बेळगाव : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याला नवी दिल्लीतील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाकडून उच्च रिकव्हरीमधील सर्वोत्कृष्ट सहकारी डिस्टिलरीसाठीचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती संचालक मंडळाने दिली.
कारखान्याचे अध्यक्ष जयकुमार जयकुमार खोत म्हणाले, ‘कारखान्याचे मार्गदर्शक अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.’ माजी अध्यक्ष एम. पी. पाटील म्हणाले, ‘कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट यासह ‘सिस्टा’चे दोन पुरस्कार मिळाले. इतिहासात पहिल्यांदाच नवी दिल्लीतील राष्ट्रीय सहकारी साखर संघाचा पुरस्कार मिळाला. राज्यात हा पुरस्कार मिळविण्याचा पहिला मान ‘हालसिद्धनाथ’ला मिळाला आहे.


















