पुणे : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी तब्बल ५१४ जण रिंगणात, माघारीकडे लक्ष

पुणे: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी तब्बल ६०१ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आली होती. छाननी प्रक्रियेत पन्नासपेक्षा अधिक अर्ज बाद झाले. सुनावणीनंतर बाद अर्जाची संख्या ४२ झाली. दरम्यान ४५ दुबार (डमी) अर्जही बाजूला केले आहेत. त्यानंतर निवडणूक कार्यालयात ५१४ जणांची यादी प्रसिद्ध केली. मोठ्या संख्येने अर्ज आल्याने राजकीय पक्षांना उमेदवार निवडीची डोकेदुखी सहन करावी लागणार आहे. राष्ट्रवादीकडे सर्वाधिक सुमारे अडीचशे इच्छुक आहेत तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे सव्वाशे, तर भाजपकडे शंभरच्या आसपास अर्ज आहेत.

पुरंदर तालुक्याच्या मांडकी जवळार्जुन या गटात सर्वाधिक इच्छुक आहेत. सर्वसाधारण प्रतिनिधी मतदारसंघात पंधरा जागांसाठी (पाच गटात प्रत्येकी तीन) सर्वाधिक साठी ३३५ अर्ज दाखल आहेत. राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखतींवर भर दिला आहे. शिवसेनेच्या सुमारे चाळीस उमेदवारांच्या मुलाखती सासवड येथे नुकत्याच झाल्या. बुधवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शंभरपेक्षा अधिक इच्छुकांच्या मुलाखती पार झाल्या. आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कारखान्याच्या २१ सप्टेंबरच्या वार्षिक सभेनंतर मुलाखती होण्याची शक्यता आहे. अंतिम एकवीस जणांच्या पॅनेलमध्ये वेगवेगळे पक्ष कोणाला संधी देतात, याची उत्सुकता लागली आहे. पॅनेल निवडीनंतर अर्ज माघारीचे त्यापेक्षा मोठे आव्हान राहणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here