साखर उद्योगाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी संघटनांच्या मागण्यांचे स्वागत : समरजित घाटगे

कोल्हापूर : साखर उद्योग सध्या विविध अडचणींच्या परिस्थितीतून जात आहे. उद्योगाचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी शेतकरी संघटनांनी शासनाकडे मांडलेल्या मागण्या महत्त्वाच्या असून, त्यांचे स्वागत करणे आवश्यक आहे. शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या हिताच्या मागण्यांसाठी सर्वांनी एकत्रितपणे शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.

येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४७व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ समरजित घाटगे, आर्यवीर घाटगे, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे आणि ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आला. कार्यक्रमाला कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे प्रमुख उपस्थित होत्या.

ChiniMandi WhatsApp Channel

कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले की, साखरेसह साखर उद्योगातील उपपदार्थांनाही शेतीमालाचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. तसेच शेतीमालाचे दर केंद्र सरकारच्या महागाई भत्त्याशी जोडण्याची गरज आहे. साखरेच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी त्याचा अपेक्षित फायदा साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झालेला नाही.कार्यक्रमास कारखान्याचे आजी-माजी संचालक, संचालिका, पदाधिकारी, सभासद तसेच ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले.

श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय साखर महासंघाकडून देशातील सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सभासद शेतकऱ्यांच्या वतीने अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे आणि समरजित घाटगे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी समरजित घाटगे म्हणाले की, हा पुरस्कार केवळ कारखान्याचा नसून विक्रमसिंह घाटगे यांनी दिलेल्या शिकवणीचा, सभासद शेतकरी, ऊस उत्पादक, कर्मचारी आणि कारखान्याशी संबंधित सर्व घटकांच्या सहकार्याचा सन्मान आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच कारखान्याला ही कामगिरी करता आली आहे.

‘चीनीमंडी’शी बोलताना समरजित घाटगे म्हणाले, गेल्या दहा वर्षांत महागाईमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र, त्या तुलनेत साखरेच्या दरात अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे साखर उद्योगासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या परिस्थितीत शेतकरी आणि कारखान्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने ठोस धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here