सातारा : शरयू साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा संपन्न; यंदा ११ लाख टन गाळपाचे लक्ष्य

सातारा : शरयू साखर कारखाना येथे आगामी २०२६-२७ गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बारावा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात पार पडला. कारखान्याचे कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांच्या हस्ते बॉयलरचे अग्निप्रदीपन करण्यात आले. आगामी हंगामात कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यात आली असून प्रतिदिन ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आगामी गाळप हंगामासाठी कारखान्याची क्षमता वाढवल्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. उपलब्ध ऊस वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने गाळप होण्यासाठी प्रशासनाने सर्व तांत्रिक तयारी, यंत्रसामग्री व मनुष्यबळाचे नियोजन पूर्ण केले आहे. या कार्यक्रमाच्या प्रारंभी संचालक अविनाश भापकर व कमल भापकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.

ChiniMandi WhatsApp Channel

ऊस उत्पादक शेतकरी हा कारखान्याचा मुख्य केंद्रबिंदू असून त्यांचा ऊस सुरळीतपणे गाळप करण्यासाठी व्यवस्थापन कटिबद्ध असल्याचे कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांनी सांगितले. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून यंदाच्या हंगामात विक्रमी गाळप करावे, असे आवाहन त्यांनी केले. या सोहळ्यास युनिट हेड सुरेश पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here