सातारा : सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी विरोधक आमनेसामने, घोषणाबाजीने वातावरण तणावपूर्ण

सातारा : यशवंतनगर येथील सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी विरोधक आमने-सामने आल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार मनोज घोरपडे, आमदार धैर्यशील कदम समर्थकांसह कारखान्यावर सभास्थळी आले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील गटाचे समर्थक, तसेच आमदार घोरपडे, आमदार कदम समर्थकांत झालेल्या जोरदार घोषणाबाजीने तणावपूर्ण वातावरण झाले. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना थोपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदार घोरपडे व आमदार कदम सभास्थळी थांबून राहिले. यादरम्यान कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांनी सभेचे कामकाज सुरूच ठेवले. सभा सुरू असताना घोषणाबाजी सुरू असल्याने तणाव वाढला.

काही ठराव झाल्यानंतर गदारोळ थांबत नसल्याने अध्यक्ष पाटील यांनी सर्व ठराव मंजूर झाल्याचे घोषित करून सभा संपल्याचे जाहीर केले. दरम्यान, आमदार घोरपडे, श्री. कदम सभास्थळी थांबूनच होते. पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी मध्यस्थी करत आमदार घोरपडे, आमदार कदमांना सभास्थळावरून जाण्याची विनंती केली. काही काळानंतर दोघेही समर्थकांसह सभास्थळापासून कारखान्याच्या मुख्य गेटवर गेले. तेथे त्यांनी समांतर सभा घेत कारखान्याच्या सभेत झालेल्या प्रकाराचा निषेध नोंदवला. दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांनी कारखान्याच्या इतिहासातील आजचा काळा दिवस असल्याचे सांगून विरोधकांनी सभा उधळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here