पुणे : नॅशनल फेडरेशनतर्फे भीमाशंकर कारखान्याचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्काराने सन्मान

पुणे : नवी दिल्लीत नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑप शुगर फॅक्टरीज लि. तर्फे मंगळवारी सन २०२४-२५ राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार सोहळा आयोजित करून देशातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक वर्षात केलेली ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना याची नोंद घेऊन हा पुरस्कारा कारखान्याला मिळाला असल्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले.

कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे-पाटील म्हणाले की, हा पुरस्कार कारखान्याचे संस्थापक व माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन, ऊस उत्पादन व सभासद वर्गाची साथ यामुळे मिळाला आहे. आजपर्यंत कारखान्याला देश पातळीवरील १४ व राज्य पातळीवरील १६ असे एकूण ३० पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार ८ वेळा मिळविणारा देशातील एकमेव साखर कारखाना आहे. यावेळी सहकार राज्यमंत्री मंत्री कृष्णन पाल गुर्जर, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, गुजरात राज्याचे पाटबंधारे मंत्री ईश्वरभाई पटेल, हरियाणा राज्याचे सहकार मंत्री अरविंद कुमार शर्मा, छत्तीसगड राज्याचे सहकार मंत्री केदार कश्यप, पंजाब राज्याचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री गुरमीतसिंग खुडीयान आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here