बांबू, इथेनॉल आणि कार्बन अर्थव्यवस्थेवर २७ सप्टेंबरपासून परिषद : पाशा पटेल यांची पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई : बांबू, इथेनॉल आणि नैसर्गिक कार्बन साठ्यांना आर्थिक मूल्य मिळवून देत महाराष्ट्राच्या हरित अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर बांबू आधारित उद्योग, जैवऊर्जा, कार्बन क्रेडिट, शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण रोजगार या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी विविध परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कार्यदलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी बुधवारी (२३ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी ‘बांबू अर्थव्यवस्था आणि शाश्वतता शिखर परिषद २०२६’, तर २८ आणि २९ सप्टेंबर रोजी ‘भारत इथेनॉल फोरम २०२६’ आयोजित करण्यात येणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

या परिषदांना धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील नेते, गुंतवणूकदार, तज्ज्ञ तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बांबू अर्थव्यवस्था, भारतातील वाढते इथेनॉल क्षेत्र आणि नैसर्गिक कार्बन साठ्यांचे आर्थिक मूल्य या तीन प्रमुख विषयांवर परिषदांमध्ये विचारमंथन होणार आहे.

२७ सप्टेंबर रोजी मुंबईतील द वेस्टिन मुंबई, पवई लेक येथे ‘बांबू अर्थव्यवस्था आणि शाश्वतता शिखर परिषद २०२६’ होणार आहे. ‘बांबूचे भविष्य : हवामान, बांधकाम, व्यापार आणि समुदाय’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेत बांबूचा हवामान बदल, बांधकाम क्षेत्र, व्यापार आणि स्थानिक समुदायांच्या विकासासाठी कसा उपयोग करता येईल, यावर चर्चा होणार आहे.

या परिषदेला राज्यपाल जिष्णू देव वर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले. याशिवाय वनमंत्री गणेश नाईक, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here