सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना १२ लाख टन ऊस गाळप करणार – आमदार अरुण लाड

सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या २०२६ २७ च्या २५ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ चिखलगोठण येथील प्रगतिशील शेतकरी सौ. व श्री. अशोक पवार यांच्या हस्ते, आमदार अरुण लाड, अध्यक्ष शरद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कारखान्याने शेतकऱ्यांना ऊस तोडणी व वाहतुकीची सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी यावर्षी घानवड आणि शिरढोण येथे नव्याने ऊस गट कार्यालये सुरू केलीत. कारखान्याची ऊस तोडणी यंत्रणा अधिक सक्षम व नियोजनबद्ध राहणार आहे. कारखान्याने २०२६-२७ मध्ये १२ लाख टन उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सभासद व शेतकऱ्यांनी ऊस पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, आमदार अरुण लाड यांनी केले.

आमदार लाड म्हणाले की, यंदाचा हंगाम आव्हानात्मक आहे. साखरेला चांगला दर मिळण्याची स्थिती असल्याने शेतकऱ्यांना चांगला ऊसदर देण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. शेतकऱ्यांचा ऊसपुरवठा, कारखान्याचे काटेकोर नियोजन महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी ऊस १४ महिन्यांचा झाल्यानंतर तोडणीसाठी द्यावा. योग्य वयाचा ऊस गाळपासाठी उपलब्ध झाल्यास अपेक्षित वजनाबरोबरच साखरेचे उत्पादनही वाढण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी ऊस पिकाची योग्य वाढ होण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी. उपाध्यक्ष जयप्रकाश साळुंखे, सर्व संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यकारी संचालक अप्पासाहेब कोरे यांनी स्वागत केले. पवन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here