शंकर साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना पंधरा दिवसांच्या पगाराएवढा बोनस : चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील

सोलापूर : श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १५ दिवसांच्या पगाराइतका बोनस देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केली. सदाशिवनगर येथे कारखान्याच्या २०२६-२७ मधील गळीत हंगामाचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या पत्नी नंदिनीदेवी यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. तसेच ऊस उत्पादक सभासदांनी घातलेल्या उसाच्या प्रमाणानुसार प्रतिटन अर्धा किलो साखर आणि कारखान्याच्या सभासदांना पाच किलो साखर सवलतीच्या दरात देण्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी ऊस वाहतूक बैलगाडी मुकादम व ऊस उत्पादक सभासदांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात बॉयलर अग्नीप्रदीपन, काटापूजन व बैलगाडी पूजन करण्यात आले. कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या पत्नी सत्यप्रभादेवी यांच्या हस्ते बॉयलर अग्नीप्रदीपन तर सहकार महर्षी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव माने-देशमुख यांच्या हस्ते काटा व बैलगाडीचे पूजन झाले. संचालक दादासाहेब वाघमोडे -पाटील व त्यांच्या पत्नी शोभा वाघमोडे-पाटील यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. ज्येष्ठ सभासद यशवंत धोंडीबा दुधाळ यांच्या हस्ते सहकार महर्षी काकासाहेब, अक्कासाहेब व पप्पासाहेब यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, शिवांशिका विश्वतेसिंह मोहिते-पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, अभिजित डुबल, कार्यकारी संचालक सुहास यादव, रविराज इनामदार व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here