पुणे : शेअरधारक ऊस पुरवठादारांना ८० किलो साखर देण्याचा भीमाशंकर कारखान्याचा निर्णय, साखर वाटप धोरणात बदल

पुणे : दुष्काळी परिस्थितीमुळे कारखान्याचे संस्थापक व माजी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या सुचनेनुसार भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने दिपावलीनिमित्त सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या साखरेच्या धोरणात बदल केला आहे. नव्या धोरणानुसार साखर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी कारखान्यावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. साखर वितरणाचे वेळापत्रक मागील वर्षाप्रमाणेच राहील. १२ ऑक्टोबरला गळीत हंगाम व गव्हाण पूजन होणार आहे, अशी माहिती बेंडे यांनी दिली. यावेळी कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर, बाळासाहेब घुले, आनंदराव शिंदे, माऊली आस्वारे, आनंदराव शिंदे, रामचंद्र ढोबळे, अंकित जाधव, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे उपस्थित होते.

अध्यक्ष बेंडे यांनी सांगितले की, जे शेअरधारक आहेत आणि ज्यांनी गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस पुरविला आहे, त्यांच्यासाठी साखर वाटप आहे. पूर्ण व अपूर्ण शेअर्सधारक व ऊस पुरवठा केलेल्यांना ८० किलो साखर मिळेल. फक्त पूर्ण शेअर्सधारक असल्यास ६० किलो साखर मिळेल. तर फक्त ऊस पुरवठा केलेल्यांना ६० किलो साखर मिळेल. अपूर्ण शेअर्सधारकांना ५० किलो साखर दिली जाईल. गावोगावी १०, २० व ५० किलो पॅकींगमध्ये साखर वाटप केले जाणार आहे. आतापर्यंत पारगाव, निरगुडसर, जांबूत, कळंब, रांजणी, मंचर गटातील गावामध्ये साखर वाटप झालेले आहे. ६ ते १० ऑक्टोबर यांदरम्यान साखर वाटप झाल्यानंतर दि. ११ ते १५ ऑक्टोबर यादरम्यान गावांमध्ये साखर वाटप करण्यात येईल. जे सभासद, शेतकरी आपल्या गावांमधून साखर घेऊ शकणार नाहीत, त्यांना दि. १६ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये कारखाना साईटवर साखर वाटप केली जाणार आहे. उर्वरीत सभासद व शेतकऱ्यांना पुढील वर्षभर कारखाना साईटवरच साखर मिळेल.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here