साखर कारखाना सक्षमपणे चालविणे हीच मंडलिक यांना खरी श्रद्धांजली : माजी खासदार प्रा. संजय मंडलिक

कोल्हापूर : हमिदवाडा साखर कारखाना कार्यस्थळावर सदाशिवराव मंडलिक यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माजी खासदार संजय मंडलिक होते. कारखाना कार्यस्थळावरील मंडलिक यांच्या पुतळ्याचे पूजन गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे व संजय मंडलिक यांच्या हस्ते झाले. यावेळी रक्तदान शिबिरही घेण्यात आले. ‘कागल ही कर्तबगारांची भूमी आहे. लोक चळवळ आणि संघर्षातून येथे अनेक नेतृत्वे घडली. याच राजकीय विद्यापीठातून सदाशिवराव मंडलिक यांचे नेतृत्व घडले. ते राजकारणातील जनपीठ, ज्ञानपीठ, संवेदनापीठ होते,’ असे मनोगत पुण्याच्या सारथी संस्थेचे माजी कार्यकारी अधिकारी डॉ. विलास पाटील यांनी केले.

कार्यक्रमात प्रा. संजय मंडलिक म्हणाले की, साखर कारखाना सक्षमपणे चालविणे हीच मंडलिक यांना खरी श्रद्धांजली होय. त्यासाठी सभासद, शेतकरी आणि कार्यकर्त्यांची साथ आवश्यक आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या शैक्षणिक संस्थांमधून आज आयएएस अधिकारी घडत आहेत. दिवंगत मंडलिक यांना अभिप्रेत असलेले काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावेळी जीवन साळोखे यांनी स्वागत केले. कार्यक्रमास युवानेते वीरेंद्र मंडलिक, समरजित मंडलिक, उपाध्यक्ष विश्वास कुराडे, नामदेवराव मेंडके, जयसिंग भोसले, शीतल फराकटे, मारुतराव चोथे, शिवानंद माळी, राज कांबळे, शेखर सावंत, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, सचिव सुदाम देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here