सोमेश्वर साखर कारखान्यासाठी ८४.२५ टक्के मतदान, आज माळेगावात मतमोजणी

पुणे : राज्यात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. ११) ८४.२५ टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद दुरगुडे यांनी दिली. तीन पॅनेल आणि अपक्ष मिळून एकूण ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सोमवारी (दि. १२) होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. दिवसभर अनेक मतदान केंद्रांवर सभासदांची गर्दी दिसून आली. काही केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बॅलेट पेपरवर मतदान करायचे असल्याने आणि त्यासाठी २० शिक्के मारावे लागत असल्याने प्रत्येक मतदाराला जास्त वेळ लागला. त्यामुळे अनेक केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या आणि मतदारांना प्रतीक्षा करावी लागली. परिणामी काही केंद्रांवर सायंकाळी ७वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.

ChiniMandi WhatsApp Channel

तीन पॅनेल आणि अपक्ष मिळून ८३ उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्येक गटात चुरशीची लढत पाहायला मिळाली. सभासदांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी पॅनेलप्रमुख, उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार प्रयत्न केले होते. मतदानाच्या दिवशीही कार्यकर्त्यांनी मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी धावपळ केली, त्यामुळे केंद्रांच्या परिसरात राजकीय हालचालींना वेग आला होता. २१ संचालकांच्या निवडीसाठी झालेल्या या निवडणुकीत तिन्ही पॅनेलनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. प्रचारसभा, सभासदांच्या भेटीगाठी आणि मतदानाच्या दिवशीची धावपळ यानंतर आता सर्व उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here