जालना : ‘समृद्धी’ १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करणार – चेअरमन सतीश घाटगे

जालना: पंधरा ऑक्टोबर २०२६ पासून समृद्धी युनिट एक आणि दोनचे गाळप सुरू होणार आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन कारखान्याने ७५० ते ८०० ऊसतोड टोळ्यांची यंत्रणा उभी केली असून, १०० ते १२० दिवसांत कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप करण्याचे नियोजन केले आहे. यासोबतच, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठरलेल्या दराव्यतिरिक्त प्रतिटन ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी केली.

यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. या परिस्थितीत शेतकरीहिताला प्राधान्य देत समृद्धी कारखान्याने गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये पाण्याअभावी वाळत असलेल्या उसाची प्राधान्याने तोड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ७५० ते ८०० ऊसतोड टोळ्यांची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. युनिट क्रमांक दोन सुरू करून कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात आली आहे. यंदा दोन्ही युनिट मिळून १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

ज्या शेतकऱ्यांचा ऊस पाण्याअभावी जळत आहे, त्यांची ऊसतोड प्राधान्याने केली जाईल. मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता, शेतकऱ्यांनी बाहेरील कारखान्यांना ऊस न देता आपल्या भागातील कारखान्यांनाच द्यावा. तसेच, हार्वेस्टरऐवजी मजुरांच्या टोळ्यांकडून ऊसतोड करून घ्यावी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी सहज चारा उपलब्ध होईल, असे चेअरमन सतीश घाटगे यांनी सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here