सातारा : खंडाळा साखर निवडणुकीचा कारखान्याच्या बिगुल वाजला, २२ नोव्हेंबर रोजी मतदान

सातारा : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून या कारखान्याच्या एकूण २१ जागांसाठी दि. २२ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. उद्यापासून (दि. १९) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २०२६- २७ ते २०३१- ३२ या कालावधीसाठी संचालक मंडळांच्या निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवार दि. १९ ते २६ ऑक्टोंबरपर्यंत रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत खंडाळ्याच्या सहाय्यक निंबधक (सहकारी संस्था) कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. त्याचदिवशी दुपारी ३.३० वाजता दाखल अर्जाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

२७ रोजी अर्जाची छाननी प्रक्रिया, तर वैध ठरलेल्या अर्जाची यादी दि. २८ रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. २८ ऑक्टोबर ते दि. १२ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत होणार आहे. आवश्यक वाटल्यास दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. दि. २४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभहोणार आहे. त्याच दिवशी विजयी उमेदवार घोषित करण्यात येणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक डॉ. प्रगती बागल काम पाहणार असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खंडाळ्याच्या सहाय्यक निबंधक सौ. प्रीती काळे व वाईचे सहाय्यक निबंधक अनिल क्षीरसागर काम पाहणार आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here