छत्रपती संभाजीनगर : जय हिंद शुगर प्रा. लि.च्या चौथ्या गळीत हंगामाचा प्रारंभ

छत्रपती संभाजीनगर : अनेक वर्षांपासून बंद असलेला गंगापूर सहकारी साखर कारखाना डिसेंबर २०२३ मध्ये जय हिंद शुगरच्या माध्यमातून पुन्हा सुरू करण्यात आला. त्यानंतर सलग तीन गळीत हंगाम पूर्ण करून कारखान्याने चौथ्या हंगामात पदार्पण केले आहे. गंगापूर कारखान्याच्या माध्यमातून संचालित जय हिंद शुगर प्रा. लि.च्या चौथ्या गळीत हंगामाचा प्रारंभ रविवारी (ता. १८) झाला. जय हिंद शुगरचे चेअरमन गणेश माने-देशमुख यांच्या हस्ते गळीत हंगामाला प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगापूर कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर होते.

यंदाच्या गळीत हंगामात अधिकाधिक ऊस गाळपासाठी आणण्याचे आवाहन करण्यात आले. कारखान्याने ऊस तोडणीचे योग्य नियोजन केले असल्याची माहिती व्यवस्थापनाच्यावतीने देण्यात आली. कारखान्याच्या संचालक मंडळाचे सदस्य रामनाथ लोंढे, दादासाहेब जगताप, शेषराव साळुंखे, बाबुलाल शेख, मनोहर दुबुले, कारभारी गायके, सुभाष भोसले, अण्णासाहेब शिंदे, देवचंद कहाटे, पोलिस निरीक्षक सलीम चाऊस, पंचायत समिती सदस्य रावसाहेब टेके, जनरल मॅनेजर वाकचौरे, चीफ केमिस्ट भोर, शेतकी अधिकारी भाकरे, सेक्रेटरी वैभव खर्डे, सचिन इंगळे यांसह कर्मचारी, शेतकरी, ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदार आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here