सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादनात वाढ करणे हे शेतकरी आणि साखर कारखानदार या दोघांच्याही हिताचे आहे. साखर कारखाने वर्षातील मर्यादित कालावधीसाठी सुरू राहत असल्याने कमी वेळेत जास्तीत जास्त ऊस गाळप करणे आवश्यक आहे. यंदाच्या गळीत हंगामात सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने नऊ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. ऊस उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असून, त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासह कारखान्यांच्या कार्यक्षमतेतही सुधारणा होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

‘गोकुळ’बाबत मुश्रीफ यांचे सूचक वक्तव्य

ChiniMandi WhatsApp Channel

‘गोकुळ’च्या संदर्भात बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, “जीवनात असे कधी कधी घडते. झालेल्या चुका दुरुस्त करूया आणि पुन्हा एकदा आपली मांड घट्ट करूया. ”या कार्यक्रमात भैय्या माने यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सूर्याजी घोरपडे, सत्यजित पाटील, शामराव पाटील, राजेखान जमादार, मनोज फराकटे, शशिकांत खोत आणि सुनील सूर्यवंशी उपस्थित होते. कारखान्याचे सरव्यवस्थापक संजय घाटगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर संतोष मोरबाळे यांनी आभार मानले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here