यंदाही सोलापूर जिल्ह्यात उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार : ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील

सोलापूर : मागील गळीत हंगामात जाहीर केल्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील उच्चांकी ३ हजार १५० रुपये प्रतिटन ऊसदरापैकी ३ हजार ५० रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. उर्वरित १०० रुपयांचा हप्ता दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे. यंदाच्या गळीत हंगामातही जिल्ह्यात उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा कायम ठेवण्यात येईल. तसेच, सभासदांना सवलतीच्या दरात साखर वाटप लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि. आणि सहयोगी ओंकार शुगर कॉर्पोरेशन प्रा. लि. यांच्या २०२६-२७ या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. हा कारखान्याचा २७ वा गळीत हंगाम आहे. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता ऊस उत्पादक सभासदांनी आपला संपूर्ण ऊस गळितासाठी द्यावा आणि चेअरमन कल्याणराव काळे तसेच ओंकार शुगर ग्रुपवर विश्वास कायम ठेवावा, असे आवाहनही बोत्रे-पाटील यांनी केले.

ChiniMandi WhatsApp Channel

मान्यवरांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन

बुधवारी (ता. १४) कल्याणराव काळे, बाबूराव बोत्रे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस्विनी बर्गे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन करण्यात आले. यापूर्वी संचालक राजाराम खासेराव पाटील आणि त्यांच्या पत्नी वर्षाताई पाटील यांच्या हस्ते बॉयलर पूजन व होमहवन करण्यात आले. तसेच, संचालक बाळासाहेब मसु माने आणि त्यांच्या पत्नी सिंधुबाई माने यांच्या हस्ते गव्हाण व काटापूजन करण्यात आले.

पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला कारखान्याचे नूतन उपाध्यक्ष मोहन नागटिळक, माजी उपाध्यक्ष भारत कोळेकर, संचालक गोरख जाधव, अण्णा शिंदे, योगेश ताड, परमेश्वर लामकाने, जयसिंह देशमुख, संचालिका उषाताई माने, संगिताताई देठे, यशवंत सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजीबापू साळुखे, प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष हरिदास मुजमुले, माजी चेअरमन महादेव देठे, सरपंच रणजीत जाधव आणि जनकल्याण हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. शिनगारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here