शरद साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, उपाध्यक्षपदी पोपट भोकरे यांची बिनविरोध निवड

कोल्हापूर : नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, तर उपाध्यक्षपदी कवठेसार येथील पोपट आण्णासो भोकरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांनी काम पाहिले. शरद सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सलग पाचव्यांदा बिनविरोध पार पडली. या निवडीमुळे कारखाना कार्यस्थळावर फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. यंदाच्या नूतन संचालक मंडळात पाच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

निवडीनंतर नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, “शरद कारखान्याने पारदर्शक कारभार आणि विश्वासार्हतेच्या बळावर सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सभासदांशी जिव्हाळ्याचे संबंध जपल्यामुळेच कारखान्याची बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखण्यात यश आले आहे.”या कार्यक्रमाला नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, युवा नेते आदित्य पाटील-यड्रावकर, सुभाषसिंग रजपूत, प्रकाश पाटील-टाकवडेकर, थबा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यकारी संचालक मोतीलाल पट्टणकुडे यांनी स्वागत केले. कार्यालयीन अधीक्षक अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. आवटी यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here