सातारा : ऊस वाहतुकीवेळी नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा पोलिसांचा इशारा

सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर रहिमतपूर पोलीस ठाण्याच्यावतीने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली चालकांमध्ये वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. पोलिस स्थानकाच्या हद्दीतील शिवनेरी शुगर मिल, जयपूर तसेच आँध रोड, कोरेगाव रोड परिसरातील जरंडेश्वर साखर कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी पेट्रोलिंग केले. यावेळी साखर कारखाना परिसरात, तसेच रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली थांबवून, चालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

ऊस वाहतुकीमध्ये ट्रॅक्टर-ट्रॉलींचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. हंगामाच्या काळात उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलींची वर्दळ असते. यात सावधगिरी न बाळगल्यास अपघाताच्या घटना वाढतात. यासाठी वाहनचालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलींना ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्यास, गंभीर अपघात घडू शकतात. त्यामुळे वाहनांना आवश्यकतेनुसार स्पष्ट दिसणारे रिफ्लेक्टर लावावेत अशा सूचना ट्रॅक्टरचालकांना देण्यात आल्या. वाहतुकीच्या नियमांच्या अनुषंगाने तपासणी करुन, नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवरकारवाई करण्याच्या सूचना रहिमतपूर पोलिस ठाण्याने केल्या आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here