नाशिक : अडचणींवर मात करत केजीएस शुगरकडून साखरेचे उत्पादन सुरू

नाशिक : साखर उद्योगात उत्पादनाची गुणवत्ता, कारखान्याचे व्यवस्थापन, तांत्रिक कौशल्य आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास या बाबींना विशेष महत्त्व आहे. या सर्व घटकांच्या समन्वयातून केजीएस शुगरने प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पिंपळगाव निपाणी (ता. निफाड) येथील होळकर ग्रुपच्या केजीएस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लि. या साखर कारखान्यात सन २०२६-२७ च्या गळीत हंगामात साखरेचे उत्पादन सुरू झाले आहे. विविध अडचणींवर मात करत कारखान्याची गुणवत्तापूर्ण साखर निर्मितीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आगामी काळात कारखान्याची देशात नावलौकिक मिळविण्याची क्षमता असेल, असा विश्वास कारखान्याचे चेअरमन संजय होळकर व संचालक मंडळाने व्यक्त केला.

याबाबत चेअरमन होळकर म्हणाले की, कारखान्याच्या माध्यमातून स्थानिक शेती आणि अर्थव्यवस्थेला बळ मिळावे, तसेच शेतकऱ्यांचे भविष्य अधिक समृद्ध व्हावे, अशी अपेक्षा आहे. आपला हक्काचा कारखाना म्हणून केजीएस शुगरला जास्तीत जास्त ऊसपुरवठा करून शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रगतीत सहभागी व्हावे. निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून कारखान्याला ऊसपुरवठा करण्यासाठी मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद ही कारखान्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे. कारखान्याच्या प्रगतीमध्ये तज्ज्ञ पदाधिकारी, अनुभवी अधिकारी, कुशल कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here