सोलापूर : ‘राजवी ॲग्रो पॉवरकडून ३१०० रुपये उचल जाहीर, दर दहा दिवसांनी ऊस बिल देणार

सोलापूर : आलेगाव बुद्रुक येथील राजवी ॲग्रो पॉवर प्रा. लि. साखर कारखान्यामध्ये यंदाच्या हंगामात गाळपास येणाऱ्या उसाचा पहिला हप्ता प्रतिटन ३१०० रुपये असेल. अंतिम ऊसदर जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांच्या बरोबरीने दिला जाईल. पहिल्या हप्त्याची रक्कम दर दहा दिवसांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. तसेच ऊसतोडणी व वाहतुकीची बिले दर पंधरा दिवसांनी संबंधित ठेकेदारांच्या बँक खात्यांत जमा करण्यात येतील अशी घोषणा कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी केली आहे.

कारखान्याचे उपाध्यक्ष सावंत म्हणाले की, २०२६-२७ च्या गाळप हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन ३१०० रुपये पहिली उचल देणार आहे. सध्या कारखान्याच्या गाळप हंगामाने गती घेतली आहे. ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपासाठी आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी राजवी अॅग्रो पॉवरला ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही सावंत यांनी केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here