कोल्हापूर : ऊस दराच्या निर्णयाचे परिपत्रक काढण्याची आंदोलन अंकुश संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कोल्हापूर : जिल्ह्यातील या वर्षीचे ऊस आंदोलन ३९०० पहिल्या उचलीवर संपले असले तरी हंगाम संपल्यावर १०० रुपये आणि साखर विक्री दर ४५ राहिल्यास २०० रुपये देण्याचे आश्वासन देऊन ऊस बिलाचे तीन टप्पे करून कारखान्यांनी आपलेच म्हणणे खरे करून दाखवले. यातून शेतकऱ्यांपेक्षा कारखानदार आपला जास्त फायदा करून घेण्यात यावर्षी यशस्वी ठरल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधील संभ्रम लक्षात घेता या वर्षीच्या ऊसदराचा तोडगा कारखान्यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर करावा, अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सहभागाने मोठ्या स्वरूपात आंदोलन होऊनही दरात फसवणूक झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे असे संघटनेने म्हटले आहे.

याबाबत संघटनेने म्हटले आहे की, सध्या बाजारातील साखर दर हे आणखी वाढत जाऊन ते किलोला ६० रुपयाच्या पुढेच राहतील, असा अंदाज आहे. वाढलेल्या साखर दराचा फायदा शेतकऱ्यांना मिळण्याची खात्री नाही. ऊसदराचा तोडगा साखर कारखानदारांच्या फायद्याचा ठरणार आहे. यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे आंदोलन ताणणे हे आम्हाला योग्य वाटले नाही. मात्र, येणाऱ्या काळात ऊस दरासाठी संघर्ष करत संघर्ष करत राहू. सर्वसमावेशक तोडगा काढला असेल तर तसे परिपत्रक कारखानदारांनी काढणे आवश्यक होते. पण, अपवाद वगळता बहुतांश कारखानदारांनी याबाबतचे परिपत्रक काढले नाही. आंदोलनकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रातील दर आणि कारखानदारांचा दर यामध्ये एकवाक्यता नाही. गेल्यावर्षी साखर ३७०० रुपयाने विकली तेव्हा कारखान्यांनी उसाला ३५०० रुपये दर दिला होता. यावर्षी साखर किमान ५० रुपयांपेक्षा अधिक दराने साखर विकली जाणार असेल तर शेतकऱ्यांना पाच हजारांहून अधिक दर मिळणे अपेक्षित होते. किमान तोडग्यानुसार परिपत्रक काढावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here