लातूर : प्रतिटन ४,२०० रुपये ऊस दरासाठी शेतकऱ्यांनी पानगाव-लातूर महामार्ग रोखला, वाहतूक विस्कळीत

लातूर : ऊसदर वाढ संघर्ष समितीच्या वतीने रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील पन्नगेश्ववर साखर कारखाना प्रशासनास ऊस दराबाबत निवेदन देण्यात आले होते. प्रतिटन ४,२०० रुपये ऊस दर देण्यासह कारखाना प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार प्रकल्पग्रस्तांना तात्काळ आपल्या कारखान्यात नोकरीवर रुजू करून घ्यावे. गेटकेनचा ऊस तात्काळ बंद करून कारखाना क्षेत्रातील वाळत असलेल्या उसाला तात्काळ गाळपासाठी घेऊन येण्याची व्यवस्था करावी, हार्वेस्टर मालकाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून होणारी पिळवणूक तात्काळ थांबवावी अशा विविध मागण्या करत संघर्ष समितीने कारखान्याच्या गेट समोर पानगाव-लातूर महामार्गावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पश्चिम महाराष्ट्रातील ऊस दराच्या आंदोलनानंतर प्रतिटन ४,२०० रुपये दर जाहीर झाला आहे. सध्या साखरेचे भाव १ हजार ४०० ते १ हजार ६०० रुपयांनी वाढले असल्यामुळे ७० टक्के होणारा नफा शेतकऱ्यांना आणि ३० टक्के नफा कारखानदारांना या नियमानुसार शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन ४ हजार २०० रुपये भाव द्यावा अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी उसाचे वजन बाहेरील काट्यावर करून आणल्यास तेच वजन ग्राह्य धरावे, अशी मागणीही करण्यात आली. प्रतिटन ४,२०० रुपये दर द्यावा, गेटकेन ऊस बंद करावा, कारखाना कार्यक्षेत्रातील वाळलेला ऊस तात्काळ गाळपासाठी घेऊन यावा या प्रमुख मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या. या वेळी पोलिस निरीक्षक शिंदे, पोलिस उपनिरीक्षक श्रीधर कांदे, पोलिस जमादार नामदेव सारोळे आदीसह कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here