जालना : उसाला प्रतिटन ३६०० रुपये उचल देण्याच्या मागणीसाठी घनसावंगीत शेतकऱ्यांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

जालना : यंदा उसाला पहिली उचल प्रतिटन तीन हजार ६०० रुपये द्यावेत यासह अन्य मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने घनसावंगी तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. २०) एकदिवसीय सामूहिक लाक्षणिक उपोषण करण्यात आले. जालना ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या पुढाकाराने हे लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले होते. मागण्यांबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यास राज्यस्तरावर संबंधितांची भेट घेऊन निवेदन देण्यात येईल. तसेच आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

गेल्यावर्षीच्या गाळप हंगामात वाढलेल्या साखरेच्या दरातून मिळालेल्या नफ्यापैकी ७० टक्के हिस्सा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा, बाजार समितीच्या वजनकाट्यावरील उसाचे वजन ग्राह्य धरणे कारखानदारांना बंधनकारक करावे, पाण्याअभावी जळणाऱ्या उसाच्या तोडणीला प्राधान्य द्यावे अशा मागण्या आंदोलकांनी केल्या, जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदारांची बैठक घेऊन उसाला पहिला हप्ता निश्चित करावा अशी मागणी आंदोलकांनी केली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कीर्ती उढाण, श्याम उढाण, जयमंगल जाधव, अशोक हेमके, अशोक राजे जाधव, विष्णू माकोडे, प्रकाश बोर्डे, भास्कर वराडे, महादेव काळे, ज्ञानेश्वर आर्दड, गजानन उगले, अंकुश बोबडे, परमेश्वर खरात, राम घोगरे, इरफान पठाण, सुंदर आनंदे यांच्यासह घनसावंगी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here