सातारा : सह्याद्री कारखान्याचा हंगाम वेगात; आतापर्यंत तीन लाख मेटिक टन ऊस गाळप

सातारा : यशवंतनगर (ता. कऱ्हाड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाने गती घेतली आहे. शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत कष्टाने पिकवलेला ऊस गाळपासाठी कारखान्याकडेच पाठविण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले आहे. त्याला प्रतिसादही मिळत आहे. कारखाना सुरू झाल्यापासून २० नोव्हेंबरपर्यंत अवघ्या ३२ दिवसात कारखान्याने तीन लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक विक्रमी गाळप केले आहे. यंदाच्या ५३ व्या गळीत हंगामात दैनंदिन ११ हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या कारखान्याने अवघ्या ३२ दिवसांत तीन लाख सहा हजार ४०० मेट्रिक टन उस गाळप केले आहे.

सध्या कारखान्याकडे क्षमतेपेक्षाही अधिक उसाची आवक होत आहे. हंगामात ऊसतोडणी वेळेत होत असल्याने ऊस उत्पादक सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी पाऊसमान, शेतीपंपांना अपुरा वीजपुरवठा तसेच नदी आणि विहिरींत पाण्याचा तुटवडा अशा अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. ऊस तोडणीसाठी २०३ टोळ्या, ७२६ ट्रॅक्टर गाडे, ५०० बैलगाड्या आणि २८ ऊसतोडणी मशीन कार्यरत आहेत. कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज सुरू आहे. प्रारंभी प्रतिदिन एक हजार २५० मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या या कारखान्याची क्षमता आजमितीस प्रतिदिन ११ हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढली आहे. कारखान्याने ऊसतोडणी, वाहतूक आणि गाळपाचे नियोजन चोख केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here