सातारा : अजिंक्यतारा कारखान्याकडून २ लाख ४३ हजार मे. टन ऊस गाळप; सरासरी साखर उतारा १०.७८ टक्के

सातारा : शेंद्रे येथील अजिंक्यतारा साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. कारखान्याने आजअखेर दोन लाख ४३ हजार मे. टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा १०.७८ असून, दोन लाख ६२ हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. कारखान्याने गाळपात आघाडी घेतली असून ऊस बिले देण्यातही वेग दिला आहे. कारखान्याकडून गतीने ऊस गाळप सुरू असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

कारखान्याने ३१ ऑक्टोबरपर्यंत ८५ हजार ३६८ मे. टन ऊस गाळप केले आहे. कारखान्याने उसाला प्रतिटन ३,९०० रुपयांप्रमाणे ऊस बिले अदा केली आहेत. कारखान्याने चालू हंगामात, मागील महिन्यात गाळप झालेल्या उसाची ३३ कोटी २९ लाख ३८ हजार ७९७ रुपये एवढी बिलाची रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आल्याचे सागण्यात आले. कारखान्याकडून जोमाने ऊस गाळप सुरू आहे. गाळपाला येणाऱ्या उसाला प्रतिटन तीन हजार ९०० रुपये बिल दिले जात आहे. कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. कारखान्याकडे नोंद केलेला संपूर्ण ऊस गाळपासाठी नेला जात आहे. कार्यक्षेत्रातील सभासद आणि ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी आपला ऊस अजिंक्यतारा कारखान्यालाच गाळपासाठी देऊन, गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी नेहमीप्रमाणे सहकार्य करावे, असे आवाहनही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here