परकीय चलन साठ्यातील तेजीला ब्रेक, साठा ५७८.४५ बिलियन डॉलरवर : आरबीआय

नवी दिल्ली : देशाच्या परकीय चलनसाठ्याच्या तेजीवर अंकुश लावण्यात आला आहे. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आठवड्यानंतर परकीय चलनसाठा घटून ५७८.४५ बिलियन डॉलरवर आला आहे. म्हणजेच या आठवड्यात परकीय चलनसाठ्यात ३८० मिलियन डॉलरची घट झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने परकीय चलनसाठ्याबाबतचा डेटा जारी केला आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, परकीय चलन ॲसेट्समध्ये ३६ मिलियन डॉलरची घट झाली आहे. या घसरणीसह तो ५०९.६९ अब्ज डॉलरवर आला आहे. भारताचा सोन्याचा रिझर्व्ह साठा २७९ मिलियन डॉलरच्या घसरणीसह ४५.२०० बिलियन डॉलरवर आला आहे.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, एसडीआरमध्ये २७ मिलियन डॉलरची घसरण झाली आहे. तर आयएमएफमध्ये भारताचा साठा १४ मिलियन डॉलरने वाढून ५.१६ मिलियन डॉलर झाली आहे. २०२२ च्या सुरुवातीला भारताकडे परकीय चलनसाठा ६३३ बिलियन डॉलरचाहोता. तर ऑक्टोबर २०२१ मध्ये परकीय चलनसाठा ६५४ अब्ज अमेरिकन डॉलरच्या उच्चांकावर होता. आरबीआयने जागतिक स्तरावरील स्थिती लक्षात घेत रुपयाच्या विनियम दरातील गतीने होणारी घसरण रोखण्यासाठी चलनाचा वापर केला. त्यानंतर यात घसरण झाली आहे. आयात महागल्याने परकीय चलन भांडारात गेल्या काही महिन्यातही घट झाली आहे. आरबीआय आणि फेडरल रिझर्व्हच्या कडक पतधोरणामुळे रुपया कमजोर झाला आहे. गुंतवणूकदार विकसनशील मार्केटमधून आपली गुंतवणूक काढून घेवून अमेरिकेसारख्या स्थिर देशात गुतवणूक करीत आहेत. तेथे त्यांना कठोर पतधोरण असुनही चांगले रिटर्न मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here