संशोधकांच्या पथकाने केली ऊस पिकाची पाहणी

73

मेरठ : दौराला साखर कारखान्याच्या परिसरातील अनेक गावांमध्ये कर्नालच्या ऊस संशोधन केंद्राच्या संशोधक, अभ्यासकांच्या पथकाने पाहणी केली. पथकामध्ये ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रविंद्र तथा एम. आर. मिणा यांचाही समावेश होता.
पथकाने भराला, चिरौडी, खनौदा, पबरसा, सरधाना, भूनी आदी गावांतील ऊस शेतीची पाहणी केली. संशोधकांनी उसाच्या ०२३८, ०११८ आदी प्रजातीच्या पिकांच्या वाढीची स्थिती, रोगाचा आणि किटकांचा प्रादुर्भाव, १५०२३ प्रजातीच्या उसाच्या वाढीची अवस्था आणि फुटवे यांची पाहणी केली. शेतकऱ्यांनी कीड नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचे संशोधकांनी कौतुक केले. पिकात टॉप बोअरर किडीची कमतरता असल्याचे सांगत हरियाणामध्ये या किडीचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.

संशोधकांनी शेतकऱ्यांना जमिनीचे संरक्षण, सेंद्रिय औषधांचा वापर, बिजोपचार, पिकाचे संरक्षण आणि उत्पादन वाढविण्याबाबत मौलिक सूचना केल्या. यावेळी कारखान्याचे महा व्यवस्थापक संजीव खाटियान, डॉ. प्रणव राणा, अभिषेक तोमर आदी उपस्थित होते.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here