सात महिन्यांनंतर वाढला साखरेचा गोडवा, प्रती क्विंटल १०० रुपयांची तेजी

चांगली मागणी आणि उचल होऊ लागल्याने गेल्या तीन दिवसांपासून देशांतर्गत साखरेच्या दरात तेजी आली आहे. बाजारातील जाणकांरांच्या मतानुसार आता नव्याने खरेदी केली जात असल्याचे दिसू लागले आहे. हिंदूंच्या श्रावण महिन्याच्या सुरुवातीसरोबरच इतर सणांची याला जोड असल्याने मागणी वाढण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊनमध्ये सवलती दिल्याने मागणीत वृद्धी दिसून येत आहे. सलग सात महिन्यांपर्यंत किंमतीमधील घसरणीनंतर देशभरात सरासरी ८० ते १०० रुपये प्रती क्विंटलची वाढ झाली आहे.

२ ऑगस्ट २०२१ रोजी राज्यनिहाय दर :
महाराष्ट्र : S/३० साखरेचा व्यापार दर ३१२० रुपये ते ३१५५ रुपये प्रती क्विंटल राहिला. M/३० चा व्यापार दर ३१८० ते ३२५० रुपये प्रती क्विंटल राहिला.
कर्नाटक : S/३० साखरेचा दर ३१६० ते ३२२० रुपये तर M/30चा व्यापार दर ३२०० ते ३२३० रुपये प्रती क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/३० साखरेचा व्यापार दर ३३२५ रुपये राहिला.
गुजरात : न्यू S/३० साखरेचा व्यापार ३१२५ ते ३१४१ रुपये तर M/३०चा व्यापार ३२२१ ते ३२४१ रुपये प्रती क्विंटल राहिला.
तामीलनाडू : S/३० साखरेचा व्यापार ३३२५ रुपये ते ३३५० रुपये आणि M/३० साखरेचा व्यापार ३३७५ से ३४०० रुपये प्रती क्विंटल राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत.)

बाजारात आलेल्या या बदलांबाबत उत्तर प्रदेशातील एका व्यापाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ऑगस्ट २०२१ या महिन्यासाठीचा कोटा जाहीर झाल्यानंतर किंमतीमध्ये १०० रुपये प्रती क्विंटलची वाढ दिसून आली आहे. खरेदीदार आजच्या किंमतीच्या आधारावर चांगला नफा मिळवत आहेत. उत्तर क्षेत्रातील रेकसाठी चांगले बुकिंग होत असल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखरेच्या दरात ३० ते ५० रुपये प्रती क्विटंल वाढ होणे ही फारशी आश्चर्याची बाब वाटत नाही.

चीनीमंडीसोबत बोलताना तमीळनाडूतील प्रमुख व्यापारी आणि एम. ए. टी. सन्सचे मालक ए. टी. मोहन म्हणाले, कोलकाता  रेकसाठी उल्लेखनीय मागणी महाराष्ट्रातील विभागांतही पहायला मिळाली. त्यानंतर बाजारात मजबुती आली आहे, दीर्घ काळानंतर चांगल्या मागण्याची स्थितीत बाजार आला आहे. आगामी काळात दर स्थिर राहतील अशी शक्यता आहे.

२०१९-२० आणि २०२०-२१ या हंगामात अतिरिक्त साखर उत्पादन झाल्याचे समोर आल्याने देशांतर्गत साखरेच्या दरात घसरण झाली आहे. एक्स मील किमतीत घसरण झाल्याने साखर कारखाने आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यामुळे ऊसाचे पैसेही शेतकऱ्यांना देणे शक्य झालेले नाही.

अथणी शुगर्सचे कार्यकारी संचालक आणि सीएफओ योगेश पाटील यांनी सांगितले की, मासिक कोटा रिलीज झाल्याने दरात ही अस्थायी स्वरुपाची वाढ झाली आहे. चालू महिन्यापुरती ही वाढ मर्यादीत राहील अशी शक्यता आहे. मात्र, सध्याची एफआरपी आणि इतर वाढलेले खर्च पाहता स्थिर साखर व्यापाराच्या मॉडेलसाठी किमान एमएसपी ३४५० रुपये प्रति क्विंटल करण्याची गरज आहे.

खासगी साखर ट्रेडिंग पोर्टल eBuySugar.comच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, व्यापार चांगल्या प्रमाणात होत आहे. यापूर्वी जाहीर केलेला मासिक कोटा लक्षात घेऊन ऑगस्टसाठी थोडा कमी साखर कोटा विक्रीसाठी जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे संस्थात्मक खरेदीदारांची नियमित मागणी आणि सणांसाठीच्या नव्या खरेदीमुळे बाजारात मजबूत करेल.

केंद्र सरकारने २९ जुलै २०२१ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशातील ५५७ साखर कारखान्यांसाठी २१ लाख टनाचा मासिक साखर विक्री कोटा मंजूर करण्यात आला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत यावेळी कमी कोटा मंजूर करण्यात आला. खाद्य मंत्रालयाने जुलै २०२१ मध्ये २२ लाख टन साखर विक्री कोटा मंजूर केला होता. तर ऑगस्ट २०२०च्या तुलनेत यावेळी जादा साखर कोटा मंजूर केला. सरकारने ऑगस्ट २०२० मध्ये २०.५० लाख टन साखर कोटा मंजूर केला होता.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here