केंद्र सरकारकडून जुलै २०२१ साठी साखर विक्रीचा २२ लाखांचा कोटा जाहीर

55

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या खाद्य मंत्रालयाने जुलै २०२१ साठी देशाच्या ५५५ साखर कारखान्यांना साखर विक्रीचा २२ लाख टनाचा कोटा मंजूर केला आहे.

गेल्या महिन्याच्या तुलनेत यंदा साखरेचा समान कोटा मंजूर करण्यात आला आहे. खाद्य मंत्रालयाने जून २०२१ साठी २२ लाख टनाचा साखर कोटा मंजूर केला होता. तर दुसरीकडे जुलै २०२०च्या तुलनेत या महिन्यात जादा कोट्याला मंजुरी मिळाली आहे. सरकारने जुलै २०२० मध्ये साखरेचा २१ लाख टनाचा कोटा कारखान्यांना दिला होता.

अनेक राज्यांनी लागू केलेला लॉकडाऊनमुळे बाजारात साखर विक्रीवर दबाव पहायला मिळू शकतो असे बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले. मान्सूनच्या आगमनाबरोबर साख वाहतुकीची गती संथ होऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्र सरकारने साखर विक्रीसाठी कोटा पद्धती लागू केली आहे. किमतीवर नियंत्रण ठेवणे आणि साठा मर्यादीत ठेवण्याच्या दृष्टीने मासिक कोटा पद्धत वापरली जाते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here