पुन्हा इंधन दरात वाढ, पेट्रोल २३ पैसे तर डिझेल २५ पैशांनी महागले

89

नवी दिल्ली : देशभरात ४ मे नंतर आज १३ व्या वेळी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात २३ पैसे तर डिझेलच्या दरात २५ पैशांची वाढ झाली. त्यानंतर आता दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोल ९३.४४ रुपये तर डिझेल ८४.३२ रुपयांवर पोहोचले आहे.

चार मे नंतर इंधन दरात ही १३ व्या वेळी वाढ झाली आहे. त्यापूर्वी पश्चिम बंगालसह इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान, १८ दिवस इंधन दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी सर्व शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केले जातात.

नव्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ९९.७० रुपये प्रति लिटर तर डिझेल ९१.५७ रुपये प्रति लिटर झाले आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल ९५.०६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.११ रुपये प्रति लिटरवर पोहोचले. तर कोलकातामध्ये पेट्रोल ९३.४९ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.१६ रुपये प्रति लिटर वर पोहोचले आहे.

व्हॅटसारखे स्थानिक कर आणि दळणवळण शुल्कामुळे इंधनाचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत. राजस्थानमध्ये पेट्रोलवर सर्वाधिक व्हॅट आहे. त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात व्हॅट आकारला जातो. तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील १५ दिवसांचा आढावा घेऊन दररोज दरात बदल करतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here