अहिल्यानगर : कुकडी साखर कारखान्याने थकवले ३७० कोटींचे कर्ज, जिल्हा बँकेने घेतला ताबा

अहिल्यानगर : मागील दोन वर्षांपासून कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप-पाटील कुकडी सहकारी साखर बंद आहे. त्यामुळे या कारखान्याने अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेले ३७० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. या थकीत कर्जापोटी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखालील कुकडी साखर कारखान्याचा ताबा सोमवारी (दि. ३१) जिल्हा सहकारी बँकेने ताबा घेतला. जिल्हा सहकारी बँकेच्या प्रशासक संगिता डोंगरे यांच्या आदेशानुसार कारखान्यावर प्रतिकात्मक ताबा घेण्याची कारवाई करण्यात आली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुकडी साखर कारखान्याकडे २०२५ पर्यंत बँकेचे ३५८ कोटींचे कर्ज थकले होते. थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने कारखान्याला जानेवारी २०२६ मध्ये नोटीस बजावली होती. बँकेने कारखान्याला दोन महिन्यांची मुदत दिली होती. त्यानंतर बँकेने मार्च २०२६ मध्ये एक महिन्यांची मुदतवाढ दिली. कारखान्याने पुन्हा एक महिन्याच्या मुदतवाढीची मागणी केली. बँकेने एप्रिलमध्ये एक मुदतवाढ दिली. मात्र कारखान्याने जूनपर्यंत कर्ज परत केले नाही. त्यामुळे बँकेने सरफेसी कायद्यानुसार पुढील प्रक्रिया केली. जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईची एसओपी (मानक प्रणाली) देण्यात आली होती.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here