दोन दिवसांनंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ, गेल्या 24 तासात 72 हजार नवे रुग्ण

नवी दिल्ली: कोरोनाच्या आकड्यांमध्ये दिवसागणिक होणार्‍या वाढीमुळे गेल्या काही दिवसांमध्ये घट दिसून आली, पण आज कोरोनाचे जास्त नवे रुग्ण आढळून आले. काल 61 हजाराच्या आसपास रुग्ण होते, तर यामध्ये आज 10 हजाराच्या जवळपास वाढ दिसून आली. दुसरीकडे, भारतामध्ये कोरोना संक्रमितांचा आकडा 67 लाखाच्या वर गेला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकड्यांनुसार, गेल्या 24 तासात कोरोनाचे 72,049 नवे रुग्ण आढळले. दरम्यान, कोविड 19 मुळे 986 लोकांचा मृत्यु झाला आहे. कालच्या तुलनेत मृतांच्या संख्येत वाढ दिसून आली. काल 804 लोकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला होता.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here