इथेनॉल मिश्रणामध्ये सर्वाधिक योगदान दिल्याबद्दल उत्तर प्रदेशातील साखर उद्योगाचे कौतुक

कानपूर : नॅशनल शुगर इन्स्टिट्यू, कानपूर आणि उत्तर प्रदेश साखर कारखाना संघाच्यावतीने संयुक्तरित्या आयोजित “विविधतेच्या युगात भारतीय साखर उद्योगाचे मॉडेल” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे ऊस विकास तथा साखर उद्योग मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या भाषणात त्यांनी साखर उद्योगाला आपली आर्थिक व्यवहार्यता सुधारण्यासाठी इथेनॉल उत्पादनावर भर देणाऱ्या साखर कारखान्यांच्या परिसरामध्ये परिवर्तीत करण्यासाठी सरकारी प्रोत्साहनाचा लाभ मिळवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. इथेनॉल मिश्रणाचे उच्च प्रमाण मिळवल्याबाबत उत्तर प्रदेशातील साखर उद्योगाचे कौतुक करताना त्यांनी साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकरी, इतर घटकांच्या हिताचे रक्षण करण्याचा सल्ला दिला.

मेसर्स दालमिया भारत शुगर लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज रस्तोगी यांनी साखर आणि इथेनॉल उत्पादनाच्या ब्राझील मॉडेलबाबत आपले विचार मांडले. त्यांनी उत्पादन खर्च कमी करणे आणि मोठ्या प्रमाणावर समाजाला मिळवून लाभ देण्यासाठी शेतापासून ते कारखान्यापर्यंत उत्पादकतेमध्ये सुधारणेसाठी तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि नव्या तंत्रज्ञानाच्या विकासाबाबत सल्ला दिला.

नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक नरेंद्र मोहन यांनी आपल्या भाषणात परिषदेत सहभागी झालेल्यांना साखर उत्पादनासाठीच्या साखर कारखान्यांच्या पारंपरिक मॉडेलला अनेक उत्पादनांच्या एकत्रित मॉडेलमध्ये बदलण्यासाठी आऊट ऑफ बॉक्स विचार करण्याचा सल्ला दिला. इथेनॉल ते ग्रीन हायड्रोडनपर्यंत, साखरेपासून डाएटरी फायबरपर्यंत, इंधनापासून इको फ्रेंडली कटलरीपर्यंत, साखर उद्योगातील वैविध्यिकरण आणि उत्पन्नासाठी अनेक संधी आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, आर्थिक स्थिरता सुधारण्यासाठी जशी विविधता आणणे गरजेचे आहे, तशाच पद्धतीने कच्चा माल आणि इथर पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसाठी एक मजबूत, आत्मनिर्भर मॉडेलची गरज आहे. आणि यासाठी साखर आणि एकीकृत युनिट्सची क्षमता वाढीसाठी काळजीपूर्वी योजना तयार केली गेली पाहिजे.

तांत्रिक सत्रामध्ये मेसर्स दालमिया भारत शुगर्स लिमिटेडचे अमित नेगी, मेसर्स अवध शुगर अँड एनर्जी लिमिटेडचे प्रमोद मेहंदिया आणि मेसर्स सेकसरिया बिसवान शुगर फॅक्टरी लिमिटेडचे शैलेंद्र त्रिपाठी यांनी इथेनॉल उत्पादनासाठी सिरप आणि बी हेवी मोलॅसिसचा वापर करताना साखर उत्पादन यंत्रात आवश्यक परिवर्तनाबाबतच्या मॉडेल्सवर आपले विचार मांडले.
संस्थेच्या शुगर इंजिनीअरिंग विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अनुप कुमार कनौजीया यांनी एका मॉडेलचे सादरीकरण केले. ते म्हणाले की, साखर कारखान्यांतील सध्याच्या यंत्रसामुग्रीत सुधारणा करून कच्ची, रिफाइंड साखरेत रुपांतरणासाठी काही कालावधीची आवश्यकता आहे. त्यातून इथेनॉल उत्पादनासाठी रस आणि बी हेवी मोलॅसीसचा वापर करण्याची सुविधा आहे. त्यांनी सांगितले की, हे एक आत्मनिर्भर मॉडेल आहे की, ज्यासाठी कमी गुंतवणुकीची गरज आहे. आणि परिणामी साखरेचे उत्पादन मर्यादीत होवून इथेनॉल उत्पादनाला चालना मिळेल. तांत्रिक अधिकारी महेंद्र कुमार यादव यांनी डिस्टिलरी फर्मेंटेरपासून कार्बन डाइ-ऑक्साइड गॅसचा वापर करून रिफाइंड साखरेचे उत्पादन आणि रिफाइंड साखरेचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी यांत्रिक वाष्प रि-कॉम्प्रेसरचा वापर करण्यासाठी एका नव्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले.
मेसर्स राज प्रोसेस इक्विपमेंट अँड सिस्टीमचे अनिल पाईस यांनी मोलॅसिसवर आधारित डिस्टिलरीतून बाहेर पडणाऱ्या कचऱ्याचे स्प्रे ड्रॉइंग तथा मौल्यवान पोटॅश खतात रुपांतर कसे करता येईल याबाबतच्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले.

नोएडातील मेसर्स आयएसजीईसीचे बिझनेस हेड संजय अवस्थी, पुण्यातील कन्सल्टंट सुरा के. भोजराज यांनी इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रीत करताना साखर कारखान्यांच्या विविध मॉडेल्सचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का कनोडिया यांनी केले. साखर तंत्रज्ञान विभागाचे सहाय्यक प्रोफेसर अशोक गर्ग यांनी समारोपाचे भाषण केले. यूपी शुगर मिल संघाचे महासचिव दीपक गुप्ता यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here