साखर कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी अजित पवार यांना साकडे

अहिल्यानगर (अहमदनगर) : राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनतर्फे राज्यातील साखर उद्योग व संलग्न व्यवसायातील कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले. साखर कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राज्यातील साखर कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.

फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक व सरचिटणीस नितिन पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळने राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांच्या कराराची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपत आली आहे. एक एप्रिलपासून कामगारांच्या नवीन वेतनवाढ देण्यासाठी व सेवाशर्तीत बदल करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार, साखर कारखाने व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली त्रिपक्षीय समिती गठीत करावी, अशी मागणी केली. फेडरेशनचे संपर्क प्रमुख सुखदेव फुलारी, संभाजीराव माळवदे, संजय राऊत, अप्पासाहेब शिंदे, अशोक भराट, बबनराव लवांडे, अशोक थिटे, अंकुश जगताप, देवीदास म्हस्के, संदीप ब्लफे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here