इंधन दर उच्चांकी स्तरावर, आता डिझेलची १०० रुपयांकडे वाटचाल

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरात आजही दिलासा मिळालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांकडून आज पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केली गेली. आज डिझेलचा दर २९ ते ३० पैसे तर पेट्रोलचा दर २३ ते २४ पैशांनी वाढविण्यात आला. अनेक शहरांमध्ये पेट्रोल आता शंभर रुपयांवर पोहोचले आहे. तर राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे डिझेल शंभर रुपयांच्या अगदी निकट आहे.

आज दिल्लीत पेट्रोलचा दर ९३.६८ रुपये तर डिझेलचा दर ८४.८४.६१ रुपये प्रती लिटर आहे तर मुंबईत पेट्रोल ९९.९४ आणि डिझेल ९१.८७ रुपये प्रती लिटरवर पोहोचले. ४ मे पासून आतापर्यंत चौदा दिवस दरवाढ झाली असून दहा दिवस दरात बदल करण्यात आलेला नाही. यादरम्यान दिल्लीत पेट्रोल ३.२८ रुपये तर डिझेल ३.८८ रुपये महागले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज कर, डिलर कमीशन आणि इतर बाबी समाविष्ट केल्यानंतर हे दर दुपटीने वाढतात. जर केंद्र सरकारने अबकारी कर आणि राज्य सरकारने व्हॅट हटवला तर इंधन दर सरासरी २७ रुपयांवर पोहोचू शकतात. मात्र महसूल मिळत असल्याने यात वाढ केली जात नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या दरावर आधारित दररोज पेट्रोल, डिझेलचे दर बदलले जातात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्थान पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल, डिझेल दरात सुधारणा केली जाते. आपण आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर दररोज एसएमएसद्वारे तपासू शकतो. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP <डीलर कोड> लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर तर एचपीसीलेचे ग्राहक HPPRICE <डीलर कोड> लिहून ९२२२०११२२ या क्रमांकावर पाठवू शकतात. बीपीसीएलचे ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून ९२२३११२२२२ नंबरवर पाठवू शकता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here